testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘मुख्यमंत्री खुर्चीवर बसा आणि पाणी द्या’

मुंबई| Last Updated: सोमवार, 11 एप्रिल 2016 (16:09 IST)
‘भारतमाता की जय’ बोलावंच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसं जिवंत राहायला हवीत. मराठवाड्यासह अनेक भागात पाण्यासाठी माणूसच माणसाचा शत्रू झालाय. भारतमातेच्या स्वप्नातील हा नाही. मुख्यमंत्री, खुर्चीवर बसा व महाराष्ट्राला पाणी द्या’ असं शिवसेनेने ‘सामना’त म्हटलं आहे.
खुर्ची गेली तरी चालेल, पण ‘भारत माता की जय’ बोलणारच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचाही ‘सामना’तून समाचार घेण्यात आला. ‘मुख्यमंत्री खुर्चीवर बसा आणि महाराष्ट्राला पाणी द्या’ असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

पाण्याअभावी राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नन निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गावात पिण्याचे पाणी देईन, नाहीतर खुर्चीवर लाथ मारीन अशी गर्जना केली असती तर ते अधिक बरं झालं असतं, असं अग्रलेखात म्हटलं आहे.


यावर अधिक वाचा :