1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. झळा दुष्काळाचा
Written By वेबदुनिया|

दुष्काळ निवारणावरील खर्चाची तपासणी

WD
दुष्काळ निवारणासाठी टँकर, चारा डेपो, जनावरांच्या छावण्या, नळ पाणीपुरवठा योजना आणि विंधनविहिरींवर झालेल्या खर्चाचे आता ऑडिट केले जाणार आहे. पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात यावर झालेल्या खर्चाची तपासणी करण्यासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पुणे विभागातील दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने विविध योजनांवर आतापर्यंत सुमारे 584 कोटी रुपये खर्च केले आहेत.