1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

मुंबईतही मतदानात निरूत्साह

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात ६२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पण राजधानी मुंबईत मात्र मतदानात निरूत्साह दिसला. मुंबई व उपनगरातील ३६ मतदार संघात सुमारे ४८ टक्के तर ठाणे जिल्हयात सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई शहरातील विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ३३.४७ टक्के मतदान झाले. यामधील शिवडी मतदार संघात सर्वात अधिक म्हणजे ४३ टक्के मतदान झाले.

धारावी या अनुसूचित जातीसाठी राखीव असणार्‍या मतदार संघात १२,२७० पुरुषांची व १०,६२८ महिला मतदारांनी मतदान केले, येथील सरासरी टक्केवारी २९.८० इतकी होती. सायन-कोळीवाडा मतदार संघात ५५,९०२ पुरुष व ३३,९७१ महिला मतदारांनी मिळून सुमारे ३१ टक्के मतदान केले. त्याचबरोबर वडाळा आणि महिम मतदारसंघात ४० टक्के, वरळी मतदारसंघात ३४ टक्के मतदान झाले.