शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑक्टोबर 2019 (15:56 IST)

अजित पवाराकडून ‘चंपा’ या शब्दाबद्दल मोठा गौप्यस्फोट

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ‘चंपा’ या शब्दाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म मला भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्यानेच सांगितला, असा दावा अजित पवारांनी पुण्यातील एका पत्रकार परिषदेत केला.
 
चंपा या शब्दावरुन कोथरुडमधील राजकारण चांगलेच गाजत असून अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची मोठी चर्चा झाली. पुण्यातील आपल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील चंपा या नावाचा उल्लेख करुन चंपाची चंपी करणार असा टोला लगावला आहे. भाजपाचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख विरोधक अनेक सभांमध्ये चंपा असा करत आहेत. चंपा असा उल्लेख सर्वात पहिल्यांदा करणाऱ्या अजित पवार यांनी हा शब्द मी शोधला नसून तो एका भाजपाच्याच कॅबिनेट मंत्र्याच्या तोंडून ऐकल्याचे त्यांनी खुलासा केला आहे.