testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मगरीचे अश्रू ऐकले मात्र आता अजित पवार यांचे अश्रू पाहिले

ajit panwar
Last Modified बुधवार, 9 ऑक्टोबर 2019 (09:11 IST)
आजपर्यंत मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांचे पाहिले, अशीही जळजळीत टीका उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केली. तसेच विशेष कायदा करुन राम मंदिर बांधण्याची मागणी
केली. यावेळी मंचावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई असे अनेक नेते उपस्थित होते.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उद्देशून बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिर, धनगर आरक्षण, महायुतीची कारणं अशा विविध विषयांना हात घातला. तसेच सूडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करणाऱ्यांवर तोफ डागत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचसोबत ‘शिवसैनिकांच्या पाठीत वार करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. कारण शिवसैनिक ही वाघनखं आहेत. प्रेमाने आलिंगन दिल्यावर पाठीत खंजिर खुपसणाऱ्याचा कोथळा बाहेर काढणारी ही वाघनखं आहेत’, असे त्यांनी ठणकावून सांगत इशारा दिला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवतीर्थावर जमले होते. लाखोंचा हा जनसमूदाय म्हणजे जणू शिवसागरच उसळल्याप्रमाणे भासत होता. पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी साऱ्याचे कान आसूसले होते. उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी सारे शिवतीर्थ दणाणून सोडले होते. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि प्रत्येक विषयावर त्यांनी खणखणीत भाष्य केले.
‘सत्ता तर पाहिजेच. आहे युती केली, कुणाला वाटलं असेल की शिवसेना झुकली असं वाटलं असेल. शिवसेना कधी झुकली नाही, झुकणारही नाही, लाचारही होणार नाही. शिवसेना फक्त शिवप्रभूंसमोर नतमस्तक होईल’, असं खणखणीत शब्दात त्यांनी सांगितले. ‘पण चंद्रकांत पाटील मध्ये म्हणाले होते आमची अडचण समजून घ्या. तुमची अडचण समजून घेतली,
आता तुम्ही महाराष्ट्राची अडचण समजून घ्या. आम्ही आहोत तुमच्यासोबत’, असेही ते म्हणाले.
‘आज शस्त्र पूजनाचा दिवस आहे. समोर जे शिवसैनिक बसले आहेत ही माझी तलवार आहे. ही अन्यायाविरुद्ध वार करणारी तलवार आहे. गोरगरीबांचं अन्यायापासून रक्षण करणारी ही माझी ढाल आहे. आणि प्रेमाने आलिंगन दिल्यावर पाठीत खंजिर खुपसणाऱ्याचा कोथळा बाहेर काढणारी ही वाघनखं आहेत. कुणी कुणी कशाचा अनुभव घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वाघ नखाने गुदगुल्या नाही करता येत, वाघनखं ही कोथळा बाहेर काढतात. म्हणून मी सांगतोय की बाबांनो आमच्या शिवसैनिकाच्या पाठीत वार करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका, असं म्हणत त्यांनी दगाफटका करणाऱ्यांना खणखणीत इशारा दिला. चांगला कारभार करण्यासाठी आपणसोबत आलो आहोत. का नाही करायचा चांगला कारभार? शिवसेना – भाजपची युतीमध्ये मधल्याकाळात जे काही चाललं होतं त्यावर बोलताना ते म्हणाले, मी एकूण लोकसभेच्यावेळी विचार केला, जे वातावरण होतं या देशात की कुणाचं सरकार येईल हे सांगता येत नाही. मग कुणाचं सरकार आपल्याला चाललं असतं? शरद पवार पंतप्रधान चालले असते, का मुलायम सिंग चालले असते का चंद्राबाबू चालले असते की मुफ्ती महम्मद, नितीश कुमार आणखी कोण चाललं असतं तुम्हाला. मायावती चालल्या असत्या. म्हणून मी विचार केला की त्यावेळेला अस्थिर लोकसभा आली असती आणि मग आपण काय केलं असतं. मग तेव्हा आपली जी काय ताकद आहे ती नक्कीच मी काँग्रेसच्या मागे कदापी उभी राहू दिली नाही, देणार नाही. त्यालाही कारण आहे. मग आपण भगव्यासाठी, हिंदुत्वासाठी युती करायची मग आधीच करून मजबूत सरकार का आणायचं नाही? जे आपण आणलं. करायचं ते उघड उघड करायचं. लपून छपून करायची औलाद शिवसेनेची नाही. करू ते उघड करू. प्रेमही उघड करू आणि वैर सुद्धा आम्ही उघड करू’, असे त्यांनी स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

Batten: बॅटन आजाराच्या फक्त एका रुग्णासाठी त्यांनी बनवलं

Batten: बॅटन आजाराच्या फक्त एका रुग्णासाठी त्यांनी बनवलं औषध
अमेरिकेत राहणारी आठ वर्षांची मिला एका असाध्य आजाराने ग्रस्त आहे. मज्जासंस्थेशी संबंधित या ...

किम जोंग उन: पवित्र डोंगरावर उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची ...

किम जोंग उन: पवित्र डोंगरावर उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची घोड्यावरून रपेट
उत्तर कोरियातील सर्वात उंच आणि पवित्र समजल्या जाणाऱ्या पॅकटू पर्वताला नेते किम जोंग उन ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये अखेर करार झालाय
युनायटेंड किंग्डम आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रेक्झिटसंदर्भातला एक करार निश्चित झाला ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी
वणी (जि. यवतमाळ ) येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य ...

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे
ऑक्टोबर महिना संपत असून काही दिवस बाकी आहेत. उर्वरीत दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ...