गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (15:38 IST)

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली

अखेर मनसेने निवडणुकीचे बिगुल फुंकले, लढवणार विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली आहे. बैठकीत मनसेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असे कळते आहे. विधानसभा निवडणूक  मनसे 100 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. बैठकीला मनसेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते, राज ठाकरे यांनी अखेर आज निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आत राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढता राज्यभरात भाजपच्या विरोधात प्रचार केला, त्यावेळी मनसे लोकसभेत शक्ती खर्च न करता विधानसभेवर लक्ष केंद्रीत करेल, असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच मनसेत विधानसभा निवडणूकही न लढवणार नाही तर निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार असे ठरले होते. याबद्दल राज यांचे निकटवर्गीय असलेले शरद पवार यांनी सुद्धा राज निवडणूक लढवणार नाहीत असे सांगितले होते. मात्र आता राज ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मनसे १०० पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवणार असून यामध्ये नाशिक, मुंबई, पुणे आदी ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत. सोबतच राज ठाकरे यांनी उमेवारांची यादी देखील मागवून घेतली आहे. याबद्दल राज ठाकरे स्वतः घोषणा करणार आहेत.