बारामती बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराची बारामती येथे काढली धिंड
शरद पवार यांच्या एकहाती सत्ता असलेल्या बारामती येथे वेगळ्याच कारणाने राजकारण तापू लागले आहे. तेथे एका बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामती विधानसभा निवडणुकीचे पक्षाचे उमेदवार अशोक अजिनाथ माने यांना मारहाण करून काळे फासुन बारामती आमराई परिसरात धिंड काढली. हा सर्मंव प्रकार दि. २२ रोजी घडला आहे. बसपाचे उमेदवार माने यांनी प्रामाणिकपणे निवडणूक न लढवता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना पाठिंबा दिल्याचा बसपा कार्यकर्त्यांनी आरोप केला असून, याच रागातुन माने यांच्या तोंडाला काळे फासुन कपडे फाडुन धिंड काढली आहे.
बारामती विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात बसपाच्या वतीने अशोक माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र निवडणुक काळात त्यांचा बारामती शहरासह अन्य भागात ही त्यांचा प्रचार सुरू होता. मात्र, मतदानापुर्वीच बसपचे उमेदवार अशोक माने यांनी एक प्रसिद्ध पत्रक काढून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पाठिंबा दिला. माने यांनी वरिष्ठ नेत्यांना कोणतीही कल्पना दिली नाही. त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातून हकालपट्टी केली. या प्रकरणी उमेदवार माने यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.त्यांची फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.