शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (15:57 IST)

राज्यपालांनी केली राष्ट्रपती राजवटीची शिफारस

राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात आधी मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र भाजपने त्याला नकार दिला. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष शिवसेनेला संधी दिली. शिवसेनेने राज्यपालांची भेट घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र आवश्यक संख्याबळ दाखवण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला. पण राज्यपालांनी त्याला नकार दिला. मग राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसला आज रात्री 8.30 पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र त्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे.
 
दरम्यान, शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्याला नकार दिला. शिवसेनेने त्यावर आक्षेप घेत, सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. शिवसेनेने त्यासाठी सुप्रीम कोर्टातील वकील आणि काँग्रेस नेते- माजी मंत्री कपिल सिब्बल यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.