सोमवार, 6 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (10:55 IST)

आता जागा वाटपाचा तिढा होणार, राष्ट्रवादी म्हणते १११ जागा घ्या

Nationalist says take111 seats
राज्यात आचारसंहिता पूर्वी जागा वाटपावरून मोठा तिढा होणार आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्या युतीच्या जागा वाटपाचा तिढा वाढणार आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या जागा वाटपाबाबत देखील गोंधळ होणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीकडून आलेली ऑफरही उघड केली आहे, काँग्रेसला 111 जागांची ऑफर राष्ट्रवादीकडून दिली आहे. 
 
आघाडीचा शेवटचा फॉर्म्युला अजून होणे बाकी आहे, काँग्रेसची  दिल्ली येथे छाननी समितीची बैठक झाली, त्यामध्ये सर्वच आमदारांची नावं काँग्रेसने जवळपास निश्चित धरली आहेत. तर राष्ट्रवादीने 111 जागांची काँग्रेसला ऑफर दिल्याची माहिती काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी दिली. मात्र काँग्रेस नुसार राष्ट्रवादीने काँग्रेससाठी 111 जागांची तयारी दर्शवली असली तरी मित्रपक्षांना 38 जागा सोडून 125 /125 जागांचा फॉर्म्युला काँग्रेसच्या मनात आहे. त्यामुळे आता आघडीमध्ये जागांवरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत.