गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (16:09 IST)

शिवसेनेच्या वाऱ्याला उभे राहायची हिंमत कोणीही करून दाखवावी !

nobody stand against ShivSena
शिवसेनेच्या वाऱ्याला उभे राहायची हिंमत कोणीही करून दाखवावी. शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. आमचे आमदार फुटणार नाहीत याची खात्री आहे. त्यांना संपर्क करण्याची कोणाची हिंमत नाही. महाराष्ट्रात आम्ही अशा गोष्टी होऊ देणार नाही, अशी शिवसेना स्टाईल प्रतिक्रिया  शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
 
 शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत. ज्या पक्षाकडे १४५ आकडा असेल त्यांनी आपले सरकार बनवावे. मी केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका तुमच्या समोर मांडतो. मी केवळ पक्षाचे काम करत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.