गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (16:30 IST)

युतीत जागा वापरावरून तिढा शिवसेना म्हणते ११० जागांचा प्रस्ताव अमान्य

आता पुन्हा जागा वाटपावरून युतीत पुन्हा तिढा निर्माण झाला आहे. शिवसेनेने भाजपाची ऑफर धुडकावली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिलेला 110 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य आहे अशी माहिती समोर येते आहे. शिवसेना ही अर्ध्या जागा आणि मित्र पक्ष मिळून अश्या 135-135-18 या सूत्रावर ठाम आहे, असे समोर येते आहे. फिफ्टी-फिफ्टी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 135-135 जागा लढवाव्यात, अशी शिवसेनेची इच्छा आहे. तर  मित्रपक्षांच्या वाट्याला 18 जागा येतील, असं सेनेने सांगितलं आहे.
 
शिवसेनेच्या नुसार 18 जागा मित्र पक्षांनी आपापल्या चिन्हावर लढवाव्यात, त्यांनी या जागा भाजपच्या कमळ चिन्हावर लढवू नयेत, अशी शिवसेनेची अट घातली आहे. तर दुसऱ्या बाजूला मित्रपक्ष जर स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नसतील, तर त्यांनी नऊ जागा शिवसेनेच्या धनुष्यबाण, आणि नऊ जागा भाजपच्या कमळ चिन्हावर लढवाव्यात, असं शिवसेनेन स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपने हा फार्मुला मान्यकेला नाही तर पुन्हा युतीत तणाव निर्माण होईल असे चित्र आहे. मोठा भाऊ म्हणून भाजपा ने राहावे अशी भाजपाचे मत आहे.