गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सांगली , सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (16:16 IST)

सत्यजित देशमुख भाजपाच्या वाटेवर ?

सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. सत्यजित देशमुख यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून ते आज (दि.१६) महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपामध्ये प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
 
सत्यजित देशमुख यांनी आगामी वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी शिराळा येथे कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा आयोजित केल्याची माहिती आहे. त्यानंतर, सोमवारी ते महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपामध्ये प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. विधान परिषदेचे माजी सभापती व सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती.
 
तेव्हापासून सत्यजित यांनी भाजपामध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सत्यजित देशमुख यांच्याशी बोलणी सुरू असून त्यांना भाजपकडून शिराळा विधानसभा मतदारसंघातून लढवले जाऊ शकते.