मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (15:43 IST)

कॉंग्रेस मुलाखतीला अनेक विद्यमान आमदारांची दांडी

Several current MLAs slapped for congressional interview
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मुलाखत प्रक्रियेकडे अनेक बड्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. या सर्वांनी मुलाखतीला हजर न राहण्यासाठी वेगवेगळी कारणे दिली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी मुंबईत काँग्रेसपुढे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. 
 
बेहिशेबी संपत्तीप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या कृपाशंकर सिंह यांनी कलिना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत अर्जही केला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मालाडचे विद्यमान आमदार अस्लम शेख शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरू असतानाच शेख यांनीही मुलाखतीकडे पाठ फिरवली. आमदार वर्षा गायकवाड, अमिन पटेलही मुलाखतीसाठी गेले नसल्याची माहिती आहे.