1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑक्टोबर 2019 (15:54 IST)

शिवसेनेला मातोश्रीच्या परिसरातच पराभवाचा धक्का

मातोश्री’च्या परिसरात वांद्रे पूर्व मतदारसंघातच शिवसेनेला पराभव झाला आहे. शिवसेनेचे उमेदवार असलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर पराभूत झाले असून, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून आमदार म्हणून निवडणू आले आहेत.  
 
शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीचा फटका सेनेला बसल्याचं चित्र समोर आले आहे. तर झिशान सिद्दीकी हे 36 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवत विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या विश्वनाथ महाडेश्वर यांना 31 हजाराच्या आसपास मतं पडली आहेत. तर अपक्ष निवडणूक लढवलेल्या शिवसेनेच्या बंडखोर तृप्ती सावंत यांना 23 हजारांच्या घरात मतं मिळाली असून, बंडखोरी थोपवण्यात शिवसेनेला  यश आलं असतं, तर शिवसेनेला आपला गड राखता आला असता. तर दुसरीकडे मात्र  मनसेचे अखिल चित्रे हे चौथ्या क्रमांकावर आहेत.
 
वांद्रे पूर्व मतदारसंघात पक्षविरोधी कारवाई केल्याचं सांगत  तृप्ती सावंत यांना पक्षातून हाकलून दिले होते. आमदारपदी असलेल्या तृप्ती सावंत यांनी तिकीट डावलल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.