1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (10:54 IST)

श्रीपाद छिंदम विधानसभेच्या रिंगणात

Shripad Chhindam in the Legislative Assembly
छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम विधानसभेच्या रिंगणात उतरला आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्ष अर्थात बसपाने श्रीपाद छिंदमला अहमदनगरमधून उमेदवारी दिली आहे.

अहमदनगर शहर मतदारसंघातून श्रीपाद छिंदम राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याविरोधात उभे आहेत. श्रीपाद छिंदम नगर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आला. मात्र आता श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.