1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2019 (10:01 IST)

भाजपची महापौर प्रचार राष्ट्रवादीचा, नोटीस आली तर तोंडावर फाडून फेकेल

The BJP mayor will tear it in the face of the Nationalist propaganda notice
उल्हासनगर येथे वेगळेच राजकीय चित्र पहायला मिळत आहे. भाजपच्या महापौर या राष्ट्रवादी कॉंग्रेसच प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाने नोटीस देखील पाठवली आहे, मात्र जेव्हा हातात जेव्हा नोटीस येईल तेव्हा ती त्यांच्या तोंडावर फाडून फेकेल असे म्हटले आहे. 
 
उल्हासनगर महापालिकेच्या भाजपच्या महापौर पंचम कलानी यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली असून, पक्षाविरोधी काम केल्यामुळे त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. उल्हासनगर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती कलानी, भाजपाच्या महापौर पंचम कलानी यांच्या सासुबाई आहेत. पंचम यांनी सासुबाईच्या प्रचारात सर्वात जोरदार व उघडपणे करत आहेत. त्यामुळेच  पंचम यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. 
 
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी आणि महापौर पंचम कलानी यांच्यात उमेदवारीची चढाओढ होती. पंचम यांना उमेदवारी मिळणार असे सांगण्यात येत होते. सुनेच्या प्रचाराच्या वेळी अडचण नको म्हणून ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र भाजपाचे पंचम कलानी यांना अखेरपर्यंत उमेदवारी न देता कुमार आयलानी यांना तिकीट दिले. 
 
त्यामुळे ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म भरला, तसेच प्रचारात भाजपच्या महापौर पंचम कलानी सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेतही पंचम या गेल्या नाहीत. पंचम यांना विचारले असता, मला अजून नोटीस मिळाली नाही असेही त्यांनी सांगितले. जरी ती नोटीस मिळाली तर ती फाडून त्यांच्या तोडांवर मारेन अशी प्रतिक्रिया महापौर पंचम यांनी दिली आहे.