1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (08:31 IST)

राज्यात मतदानासाठी वापरात आहेत 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट मशीन

There are 1 lakh 35 thousand VVPAT machines in the state for voting
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक- व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल) 288 मतदारसंघात पाठविण्यात आले आहेत.
 
या निवडणुकीसाठी 288 मतदारसंघातील 96 हजार 661 मतदान केंद्रावर 1 लाख 80 हजार मतदान यंत्र (ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन), 1 लाख 27 हजार नियंत्रण यंत्र (कंट्रोल युनिट) आणि 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक) आणि राखीव यंत्रेही पाठविण्यात आली आहेत.निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट महत्वाचे असतात. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून सर्वप्रथम 2019च्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला होता.