सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (08:22 IST)

भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

भाजपच्या नाशिक मध्यच्या उमेदवार देवयानी सुहास फरांदे व पप्पू शेख यांनी दि. १७ ऑक्टोबर रोजी पावणे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान वडाळा रोडवरील रहनुमा उर्दू स्कूल येथे सक्षम अधिकार्‍याची परवानगी न घेता प्रचार केल्याने त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शाळेच्या सभेत जावून प्रचार केल्याची तक्रार दानीष अक्रम शेख यांनी केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती १२४ मध्य नाशिक विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.  याबाबत अधिक तपास पी. एस.आय.जाधव करीत आहेत.