सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (13:59 IST)

महाशिवरात्री 2021 : इच्छित परिणाम मिळविण्यासाठी महादेवाला हे अर्पित करा

महाशिवरात्री पवित्र सण आहे आणि या दिवशी शिव-पार्वती पूजन करुन विशेष फल प्राप्त करता येऊ शकतं. यादिवशी सर्व इच्छा पूर्ण होतात. भक्त आपल्या इच्छेप्रमाणे महादेवाला विशेष वस्तू अर्पित करुन त्वरित इच्छित फल प्राप्त करु शकता.
 
* महाशिवरात्रीला शिवलिंग आणि मंदिरात महादेवाला गायीच्या कच्च्या दूधाने स्नान घातल्याने विद्या प्राप्त होते.
 
* महादेवाला ऊसाच्या रसाने स्नान घातल्याने लक्ष्मी प्राप्ती होते.
 
* महादेवाला शुद्ध पाण्याने स्नान घातल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
* शिवलिंगावर बिल्वपत्र, अक्षता, दूध, फुलं आणि फळं अर्पित करावे.
 
शिवरात्रीला शिव आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी व्रत केल्याचे महत्तव सांगितले गेले आहे. शिव पूजेत आकड्याचे फुलं आणि बिल्व पत्राचे विशेष महत्व आहे. ताटलीत कुंकू, हळदी, गुलाल, अक्षता, जानवी यासह अष्ट गंध किंवा चंदन असावे. शिवलिंगावर ॐ नमः शिवाय या उच्चारणासह जल अर्पित करुन पंचामृताने अभिषेक करावे. जल अर्पण करुन कुंकू अर्पित करावे आणि आस्थानुसार नैवेद्य (बोर, मिठाई) अर्पण करुन आरती करावी. शक्य असल्यास पूजा-अर्चना सह भांग किंवा खव्याने श्रृंगार देखील करावे.
 
पूजेत आकड्याचे फुलं, धतुरा, पुष्प, इतर अर्पित करुन प्रार्थना करावी. व्रत करणार्‍यांन भक्तांनी एकावेळी फलाहार करावा. शिवरात्रीला रात्री पूजा करण्याचे विशेष महत्तव आहे. भक्तांनी रूद्र, शिवाष्टक पाठ करावा.