गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By

महाशिवरात्रीसाठी खास व्यंजन पनीर- पोदिना कटलेट

साहित्य : 250 ग्राम ताजं पनीर, 1/2 कप शिंगाड्याचे पीठ, 2-3 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा वाळवलेले पोदिन्याची पूड, 1/2 चमचा लिंबाचं रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, उपवासाचे मीठ चवीप्रमाणे.
 
कृती : पनीर कटलेट्स करण्यासाठी सर्वप्रथम पनीरला किसून घ्या. हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून शिंगाड्याच्या पिठात पनीर आणि मिरच्या घाला. आता उरलेले साहित्य वाळवलेल्या पोदिन्याची पूड, लिंबाचा रस, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्याला मिक्स करून हवे त्या आकाराचे कटलेट करा. तवा गरम करून त्या वर थोडे तूप किंवा शेंगदाण्याचे तेल टाकून दोन्ही कडून कुरकुरीत खमंग शॅलो फ्राय करून घ्या. तयार कट्लेट्सला दह्या किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा.

- राजश्री कासलीवाल