शिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ
महादेव
परिपूर्ण होण्यासाठी महादेवाची उपासना केली जाते. महादेव म्हणजे परिपूर्ण पावित्र्य आणि ज्ञान. म्हणूनच महादेवाची पूजा- आराधना केल्याने अनेक व्रतांचे फळ प्राप्त होतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले गेले आहे.
कर्पूरगौर
शिवाचा रंग कर्पूरासारखा म्हणजेच कापरासारखा पांढरा आहे. म्हणून त्याला ‘कर्पूरगौर’ असे म्हणतात. मूळ पांढर्या रंगातील स्पंदने साधकाला सहन होणार नाहीत म्हणून राखाडी रंगाचे आवरण शिवाच्या शरिरावर असते. हे राखाडी रंगाचे आवरण म्हणजे चिताभस्म असते. शिवाला रोज नवीन चिताभस्म लागते.
त्रिनेत्र
शिवाचा कपाळावर भुवयांच्या मध्ये जरा वर ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा आहे. हा डोळा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे तो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो. असे मानले जाते कि जर महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे सर्व काही राख होत असे.