सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

महादेवाला या प्रकारे अर्पित करा बेलपत्र

श्रावण मासात महादेवाला बेलपत्र अर्पित करण्याचे जितकं महत्तव आहे, तेवढेच गुणी बेलाचं झाडं देखील आहे. आज आम्ही आपल्याला बेलाच्या झाडाबद्दल महत्त्वाची माहिती पुरवणार आहोत: 
 
1. बेलाचं झाड घरात लावल्याने आणि दररोज त्याचे दर्शन घेतल्याने सर्व प्रकाराच्या पापांपासून मुक्ती मिळते.
 
2. बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असल्याचे मानले गेले आहे. याची पूजा केल्याने दारिद्रय दूर होतं आणि बिल्वपत्राचे झाड आणि पांढरं अर्क जोडीने लावल्याने सतत लक्ष्मीची प्राप्ती होते.
 
3. रविवार आणि द्वादशी तिथीवर बिल्वपत्राच्या झाडाचे पूजन करण्याचे विशेष महत्व आहे. या दिवशी पूजन केल्याने मनुष्य ब्रह्म हत्या सारख्या महापापापासून मुक्त होतो. याच्या प्रभावामुळे यश आणि सन्मान मिळतं.
 
4. बेलाच्या झाडाचं निवास स्थळ उत्तर-पश्चिम दिशेला असल्यास यशात वृद्धी होते. उत्तर-दक्षिणमध्ये असल्यास सुख शांती वाडते आणि हे झाड निवास स्थळाच्या मध्याला असल्यास जीवनात गोडवा येतो.
 
5. जर मृतदेह बेलाच्या झाडाच्या सावलीखालून काढल्यास मोक्ष प्राप्ती होते.
 
6. वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी बि‍ल्वपत्राच्या झाडाचं महत्व आहे. हे आपल्या जवळपासचं वातावरण शुद्ध आणि पवित्र ठेवण्यास मदत करतं. घराच्या जवळपास बिल्वपत्राचं झाड असल्यास तेथे साप किंवा विषारी जीवजंतू देखील येत नाही.
 
7. हे झाड लावल्याने वंश वृद्धी होते आणि महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते.
 
8. जेथे बेलाचं झाड असतं ती जागा काशी तीर्थ समान पूजनीय आणि पवित्र असल्याचे मानले जाते, तेथे अक्षय पुण्य प्राप्ती होते.
 
9. घरात बिल्वपत्राचं वृक्ष असल्यास कुटुंबातील सर्व सदस्य अनेक प्रकाराच्या पापांपासून मुक्त होतात.
 
10. या व्यतिरिक्त बिल्वपत्राच्या झाडाला नियमित रूपाने पाणी घातल्याने पितरांना तृप्ती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते.
 
11. बिल्वपत्राच्या झाडाखाली शिवलिंग पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
12. बिल्वपत्राचं झाड कापणे पाप मानले गेले आहे, ज्याने कुळाचा नाश होतो.
 
 
बेलपत्र तोडण्याचे नियम:
 
1. चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला, तसेच सं‍क्रांत आणि सोमवारी बेलपत्र तोडू नये.
 
2. बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून या तिथीला तोडलेले पानं महादेवाला अर्पित करु नये.
 
3. शास्त्रांप्रमाणे नवीन बेलपत्र मिळत नसेल तर अर्पित केलेलं बेलपत्र धुऊन पुन्हा वापरता येतं.
 
4. डहाळीहून निवडून केवळ बेलपत्र तोडले पाहिजे, कधीही पूर्ण डगाळ तोडू नये. पत्री तोडताना झाडाला हानी होता कामा नये.
 
5. बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि नंतर झाडाला मनात प्रणाम करावे.
 
शिवलिंगावर या प्रकारे चढवा बेलपत्र:
 
1. महादेवाला बेलपत्र नेहमी उलटं अर्पित करावं अर्थात पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या वरच्या भागाला असावा.
 
2. बेलपत्रात चक्र आणि वज्र नसावे.
 
3. बेलपत्र 3 ते 11 दल या प्रकारे असतात. जितके अधिक दल असतील तितकं उत्तम मानले जाते.
 
4. बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेलाच्या झाडाचे दर्शन मात्र पाप नष्ट करण्यासाठी पुरेसं आहे.
 
5. शिवलिंगावर इतर कोणी अर्पित केलेल्या बेलपत्राची उपेक्षा किंवा अपमान करणे योग्य नाही.