शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

संक्रात म्हणजे प्रेरणा देणारा सण!

WD
भारतीत संस्कृतीत सणांची मोठी परंपरा आहे. प्रत्येक सण काही विशिष्ट संदेश देत असतो. एक वेगळी प्रेरणा अशा सणांतून आपल्याला मिळत असते. मकर संक्रांत हाही असाच प्रेरणा देणारा सण आहे. भारतीय धर्मशास्त्रामध्ये संक्रांत साजरी करण्याच्या अनेक पद्धती आढळून येतात. प्रत्येक राज्यामध्ये भिन्न पद्धतीने संक्रांत साजरी केली जाते.

या वर्षी संक्रांतीचा पुण्यकाल 15 जानेवारी रोजी (रविवारी) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. ऋतू बदलत असल्याने शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या दिवशी तीळमिश्रित पाण्याने स्नान करावे. तिळाचे उटणे अंगास लावावे, तीळ होम करावा, या सार्‍या विधींसोबतच तीळ भक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण संक्रांतीला तीळ भक्षण करत असतो.

तीळदान करण्यानेही पुण्य प्राप्त होत असल्याने आपण या दिवशी एकमेकांना तिळगूळ देत असतो. अशा एकूण सहा प्रकारे आपण तिळाचा संक्रांतीच्या दिवशी उपयोग करत असतो.

या काळात खालील बाबी कटाक्षाने टाळाव्यात :
पर्वकालात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष- गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे, आदी कामे करू नयेत.

संक्रांत पर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने :
नवे भांडे, गायीला घास, तीळपात्र, सोने, गाय, वस्त्र, घोडा, गूळ इत्यादी यथाशक्ती दाने करावीत.

मकर संक्रांतीचा शुभेच्छा...