Widgets Magazine
testwebdunia0
गुरूवार, 23 नोव्हेंबर 2017
Widgets Magazine
Widgets Magazine

1996 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच

Last Modified: शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (13:48 IST)

world cup 2015

1996 : अरविंद डी'सिल्वा (नाबाद 107, 42 धावा देऊन 3 विकेट) 17 ऑक्टोबर 1965ला कोलंबोमध्ये जन्म घेतलेले अरविंद डी'सिल्वा यांना आपल्या ऑलराउंड प्रदर्शनासाठी 1996च्या वर्ल्ड कपमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' घोषित करण्यात आले. डी'सिल्वाने 31 मार्च 1984ला पहिला  एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडच्या विरुद्ध खेळला होता, आणि त्यांचा शेवटचा वनडे 18 मार्च 2003ला ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध होता.   
 
डी'सिल्वा यांना टेस्ट केप घालण्याचे सौभाग्य 23 ऑक्टोंबर 1984ला इंग्लंडच्या विरुद्ध मिळाले जेव्हाकी त्यांनी आपला शेवटचा टेस्ट मॅच 23 जुलै 2002ला बांगलादेशाच्या विरुद्ध खेळला. डी'सिल्वाने 93 टेस्ट सामन्यात 6361 धावा काढल्या, ज्यात 20 शतक आणि 22 अर्धशतक काढले. त्याचा उच्चतम स्कोर 267 धावा. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी 29 विकेट घेतले.
 
श्रीलंकेच्या या फलंदाजाने 308 वनडे सामन्यात 9284 धावा काढल्या, ज्यात 11 शतक आणि 64 अर्धशतक सामील आहे. वनडेमध्ये त्यांचा उच्चतम स्कोर 145 धावा. हेच नव्हे तर त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 106 विकेट घेतले. Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

यावर अधिक वाचा :