Widgets Magazine
testwebdunia0
गुरूवार, 18 जानेवारी 2018
Widgets Magazine
Widgets Magazine

1999 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच

Last Modified: शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (13:48 IST)

world cup 2015

1999 : शेन वॉर्न (33 धावा देऊन 4 विकेट) ऑस्ट्रेलियाचे शेन वॉर्नला स्पिनचा जादूगार म्हटले जात होते. 1999च्या वर्ल्ड कपमध्ये वॉर्नने फायनलमध्ये फक्त 33 धावा देऊन चार विकेट घेऊन 'मॅन ऑफ द मॅच' बनण्याचा सन्मान मिळवून घेतला. 13 सप्टेंबर 1969ला जन्म घेणार्‍या शेन वॉर्नला क्रिकेटच्या बायबिल 'विस्डन'च्या पॅनलने सदीचे पाच सर्वश्रेष्ठ गोलंदाजांमध्ये सामील करण्यात आले होते.  
 
वॉर्नने टेस्ट आणि वनडेमध्ये 1000पेक्षा अधिक विकेट घेतले. वॉर्नने 2 जानेवारी 1992मध्ये भारताच्या विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि शेवटच्या सामना 2 जानेवारी 2007मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध खेळला होता.   

वॉर्नने पहिला वनडे मॅच 24 मार्च 1993 रोजी न्यूझीलंडच्या विरुद्ध खेळला होता, जेव्हाकी अंतिम वनडे त्यांनी 10 जानेवारी 2005ला विश्व एकादश तर्फे आशिया एकादशच्या विरुद्ध खेळला होता. जुलै 2013मध्ये त्यांनी सर्व प्रकाराच्या क्रिकेटशी संन्यास घेतला. शेन वॉर्नने 145 टेस्ट मॅचमध्ये 708 विकेट घेतले. त्यांनी 37 वेळा एक डावात पाच, 10 वेळा एक टेस्टमध्ये 10 विकेट घेतले. त्यांचा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन 71 धावा देऊन 8 विकेट घेण्याचा राहिला. टेस्ट मॅचमध्ये त्यांनी 3154 धावा काढल्या. वॉर्न यांनी 194 वनडे मॅचमध्ये ऐकूण 293 विकेट घेतले आणि 1018 धावापण त्याच्या बल्लेतून निघाले. Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

यावर अधिक वाचा :