मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (09:10 IST)

गयाना येथे भारतीयांना उद्योगाच्या संधी, मंगळग्रह मंदिरात वेस्टइंडीज येथील राजदूत डॉ.श्रीनिवासा यांची पत्रकार परिषदेत माहिती

अमळनेर:- वेस्टइंडिज देशात ३ लाख २० भारतीयांचे अस्तित्व आहे. या देशात शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात चालणा आहे. पुर्वी कामगारांची आवश्यकता भासत असल्याने अनेक भारतीचे स्थलांतर वेस्टइंडिज देशात झाले. व्यवसायासाठी पोषक वातावरण असल्याने पाच वर्षासाठी करार करून गेलेले. अनेक भारतीय नागरिकांचे याठिकाणी वास्तव्य आहे. त्यामुळे भारतीयांना येथे उद्योगाची संधी असल्याची माहिती पत्रकार परिषदेत वेस्ट इंडिज येथील भारतीय राजदूत डॉ.के.जे.श्रीनिवासा यांनी दिली.

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात सोमवारी वेस्टइंडीज येथील भारतीय राजदूत डॉ.के.जे.श्रीनिवासा यांनी भेट दिली.  पहाटेच्या महापुजेनंतर डॉ.श्रीनिवासा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
यावेळी डॉ. श्रीनिवासा म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात जगभरात लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा काळात भारताने पहिली स्वदेशी लस तयार केली होती. भारताने अनेक मित्रराष्ट्रांना लसीकरणाचा पुरवठा केला होता. वेस्टइंडीज किंवा अन्य देशात भारताचे प्रतिनिधीत्व करीत असतांना भारताला तत्काळ मदत केली जाते. कारण तेथील नागरिकांना नेहमी जाणीव असते की भारताने कोरोना महामारीच्या काळात आपल्याला लस उपलब्ध करून देत आपला जीव वाचविला आहे. त्यामुळे भारताने अन्य देशात आर्दश निर्माण केला आहे.

भारतीय संस्कृतीचे परदेशात घडते दर्शन
या देशात भारतीयांची संख्या ४० टक्केपेक्षा अधिक असल्याने येथे गेल्यावर भारतातच असल्याची जाणीव होते. वेस्ट इंडिज देशात मुस्लिम समुदायाची संख्या सर्वाधिक आहे. मात्र हा देश धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो. एकाच घरात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे हा देश अन्य देशाच्या तुलनेत पुढे आहे. याठिकाणी सकाळी श्रीराम व कृष्णाची भक्तीगीत ऐकायला येतात. त्यामुळे परदेशात असतांना देखील भारतीय संस्कृतीचे दर्शन घडून येते.

जळगाव जिल्ह्यातील सुवर्ण व्यवसायाचे कौतूक
भारतीय असल्याने खान्देशात यापुर्वी येण्याचा योग आला होतो. जळगाव जिल्हा सुवर्ण व्यवसाय प्रसिध्द असल्याने सोने खरेदी केली होती. यावेळी डॉ. श्रीनिवासा यांनी सुवर्ण व्यवसायिकांच्या कलेचे कौतूक केले.

Published By- Priya Dixit