मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीस प्रारंभ
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीस प्रारंभ झाला. मराठा आंदोलनाची पुढील बैठक ठरविण्यासाठी आयोजित या बैठकीस खासदार संभाजी राजे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत.ब्रिटीश काळापासून मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळत होते, १९५० नंतर मात्र ते बंद झाले अशी माहिती मराठा समाजाचे विधी तज्ञ तांबे यांनी यावेळी दिली. मराठा समाजाच्या आरक्षणा बाबतच्या कायदेशीर बाबींबाबत त्यांनी बैठकीत माहिती दिली.
आपल्या भाषणात तांबे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत झालेल्या विविध टप्प्याची माहिती दिली. बैठकीचे प्रास्तविक समन्वयक करण गायकर यांनी केले. बैठकीस खासदार संभाजी राजे भोसले यांसह यश राजे भोसले, सुनिल बागुल, खासदार हेमंत गोडसे, विनोद पाटिल, संजीव भोर, राजेंद्र दाते पाटील, अर्जुन टिळे, वत्सला खैरे, करण गायकर, तुषार जगताप, आमदार सीमा हिरे, माजी आमदार नितीन भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित आहेत.