गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (17:17 IST)

मराठा आरक्षण लढ्यात विसंवाद ?, संभाजीराजेंची भूमिका अमान्य

Disagreement in Maratha reservation
मराठा समाजाला EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटकांत समावेश न करण्याबाबतची खासदार संभाजीराजे यांची भूमिका चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांनी दिली. ते साताऱ्यात बोलत होते. येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या 3 मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र बंदचा इशारा सुरेश पाटील यांनी दिला. 
 
संभाजीराजे यांनी अनेक जाचक अटी असल्याचं सांगत मराठा समाजाला त्याअंतर्गत आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. ही भूमिका मुख्यमंत्र्यांनीही मान्यही केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. मात्र आता मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांना संभाजीराजेंची ही भूमिका मान्य नसल्याचं म्हटलं आहे. 
 
संभाजी महाराज हे राजे आहेत. ते शाहू महाराजांचे वंशज आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाण्यापूर्वी सर्व संघटनांची बैठक घेऊन सर्वांची मतं घ्यायला पाहिजे होती. काही संघटनांचं ऐकून त्यांनी ही चुकीची भूमिका घेतली आहे, असं सुरेश पाटील म्हणाले.