मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (08:05 IST)

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार; चंद्रकांत पाटलांनी शिकवू नये- खासदार संभाजीराजे

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे माझी नेमणूक कोणाच्या सांगण्यावरून झालेली नाही, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी मला काही शिकवू नये. मी शाहू महाराजांचा वंशज आहे, असे उत्तर खा. संभाजीराजे छत्रपती यांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे सांगितले. भाजपाचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार संभाजीराजे यांच्यामध्ये सध्या वाक्युद्ध सुरू आहे. संभाजीराजे म्हणाले, की मराठा समाजाच्या हक्कासाठी मी सन २००७ सालापासून लढा देत आहे व हे सर्व जनतेला माहीत आहे, मात्र चंद्रकांत पाटील यामध्ये केव्हा आले हे मला तर काही आठवत नाही. मला कोणी शिकवू नये. जर देवेंद्र फडणवीस यांनी सल्ला दिला, तर मी त्यावर बोलेन असे सांगितले.