शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (22:30 IST)

संभाजी राजे यांची रायगडमधून जनसंवाद यात्रा सुरू

मराठा आरक्षणासाठी रायगड ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे. याबाबत खासदार संभाजी राजे यांनी इशारा दिला आहे. संभाजी राजे हे रायगडमधून जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. मराठा समाजाने लाँगमार्चच्या तयारीला लागावे, असे आवाहन संभाजी राजे यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांवर सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आता मराठा समाजाने पुणे ते मुंबई लाँगमार्च काढण्याची तयारी करावी, असे ते म्हणाले.
 
मराठा आरक्षण जनसंवाद दौरा हा रायगड जिल्ह्यातून करण्यात येणार आहे.  मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्यात खोपोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून संभाजी राजे यांनी अभिवादन केले. राजर्षि शाहू छत्रपती महाराजांनी आरक्षण देत असताना ठेवलेला व्यापक दृष्टिकोन ध्यानी घेऊनच डॉ. बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली, अशी माहिती संभाजी राजे यांनी दिली.