शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (08:52 IST)

7 नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाकडून मातोश्रीवर मशाल मोर्चा

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे आक्रमक झालेले मराठा आंदोलक आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर धडकणार आहेत. येत्या 7 नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाकडून मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्वपक्षीय मराठा आमदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चाच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल. 
 
मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत मातोश्रीवर मशाल मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 7 नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता मातोश्रीच्या दिशेने मशाल मोर्चा निघेल. याशिवाय, अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मराठा आरक्षण उपसमितीही बरखास्त करण्यात यावी, असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.