शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (09:00 IST)

मराठा आरक्षण : उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या लातूरमधील एका उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. चाकूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणावर लातूरमधील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
लातूर जिल्ह्यातील बोरगावमधील किशोर कदम या 25 वर्षीय या तरुणाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं आहे. बीएड झालेला हा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.
 
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (9 सप्टेंबर) राज्यातील मराठा आरक्षणाला स्थिगीती दिल्यामुळे हताश झालेल्या या तरुणाने तहसील कार्यालयात जाऊन विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.