शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (08:04 IST)

मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही

कोणत्याही परिस्थितीत मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही. वेळ पडल्यास उत्तराला उत्तर देऊ, असे वक्तव्य मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केले. राज्याचे मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशी भूमिका घेतली होती. राज्य सरकारने मराठा समाजाच्या जागा वगळून नोकरभरती सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.
 
या पार्श्वभूमीवर आबासाहेब पाटील यांनी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांच्यासह ओबीसी समाजाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. ओबीसी समाजाचे नेते चुकीची वक्तव्ये करुन समाजातील वातावरण खराब करत आहेत. मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही. ओबीसी नेत्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. मराठा विद्यार्थ्यांच्या जागा बाजूला ठेवून नोकरभरती होऊ देणार नाही. वेळ पडल्यास उत्तराला उत्तर देऊ, असा थेट इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला.