शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 3 ऑक्टोबर 2016 (17:45 IST)

भर पावसात भुजबळ समर्थकांचा मूक मोर्चा

काही दिवसांपासून जय्यत तयारी केल्यानंतर नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ विराट मूक मोर्चा काढण्यात आला. ऐन पावसात संपूर्ण मोर्चा पार पडला. मोर्चाला महिलांची लक्षणीय गर्दी होती. देशाच्या वेगवेगळ्या भागातून समर्थक आल्याचे  दिसून आले. सुमारे दहा ते पंधरा लाख भुजबळ समर्थक एकत्र आल्याचा दावा मोर्चा आयोजकांकडून करण्यात आला आहे. यासोबतच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे आजी माजी नेते सुद्धा मोर्चात सहभागी झाले.  
 
सहा महिन्यांपासून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले भुजबळ यांचा जामिनासाठी न्यायालयीन लढा सुरु आहे. मात्र अद्यापही जामिन मिळालेला नाही. त्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये निर्माण झालेला असंतोष व्यक्त करण्यासाठी त्यांनी स्वयंस्फुर्तीने सदरचा मूक मोर्चा काढला. शहरात मराठा मोर्चा पार पडल्यानंतर लगेचच या मोर्चाची तयारी सुरु झाली होती. ही तयारी सुद्धा मराठा मोर्चा सारखीच जय्यत स्वरूपाची करण्यात आली होती.