1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : गुरूवार, 23 जुलै 2020 (16:35 IST)

असावा हात "त्याचा"शिरी सर्वांच्या

gajanan maharaj
स्मरण नित्य, नित्य साधना,
नेते मानवा, निकट गुरुचरणा,
श्वास एक ध्यास एकच असेल ज्याचा,
स्वच्छ आचरण, मार्ग सुकर होईल त्याचा,
राहून संसारी हे येते बरें मिळविता,
कर्तव्य पाळूनिया सर्वच येते सांभाळता,
हेंच तर खरें जीवनाचे सार आहे,
पळून न जाता, लढण्यात कौशल्य आहे,
असावा हात "त्याचा"शिरी सर्वांच्या,
काळजी नाहीच मग मनी तुमच्या आमच्या!!...
.!!जय गजानन!!
.......अश्विनी थत्ते