बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (08:34 IST)

बुधवारची आरती : एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥
अगम्य गम्य रुप आनंदघन ॥
मयूरपूर रहिवास कैलास (स्वानंद) भुवन ॥
ब्रह्मादिक सुरवरां नकळे महिमान ॥
जयदेव जयदेव जय जय गजवदना ॥
आदि पुरुषा भाळिं चंद्र त्रिनयना ॥
कृपा अमृत घन भवताप शमना ॥
उजळूं अष्टभावें आरति तव चरणा ॥१॥धृ०॥
सहस्त्रवदनें शेष वर्णिंता झाला ॥
नकळे तुमचा महिमा स्तवितां श्रमला ॥
मौन धरुनि वेद श्रुति परतल्या ॥
तोचि (हाचि) मोरेश्वर विश्वंभरीं अवतरला ॥जयदे० ॥२॥
कोटि सूर्य प्रकाश कोटि (शशि) निर्मळ ॥
सर्वात्मा सर्वांजीवीं जिव्हाळा ॥
मोरया गोसावी पाहे अवलीला ॥
देव भक्त प्रेमें घेति सोहळा ॥ जयदेव० ॥३॥