शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2017
Written By

मकर राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

नवीन वर्षांत गुरुची तुम्हाला उत्तम साथ मिळणार आहे, पण साडेसातीची सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा पवित्रा सावध ठेवणे आवश्यक आहे. अती अभिलाषा न ठेवता स्वत:च्या मर्यादेत राहा, नाहीतर नंतर पस्तावण्याची वेळ येईल. प्रगतीची नवीन उद्दिष्टे  डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही वाटचाल करीत राहाल. त्याचे चांगले फळ पुढील दिवाळीपूर्वी दिसून येईल. तुमची गुंतवणूक आणि श्रम जरी वाढले तरी तुम्ही आशावादी दिसाल. जानेवारी ते मे -जून 2017 यादरम्यान स्पर्धा आणि पैशाची तंगी जाणवेल. त्यावर युक्तीने एखादा मार्ग शोधून काढाल. त्याच वेळी एखाद्या मोठ्या बदलाची नांदी होईल. ज्यातून एक नवीन पर्वाची सुरवात होईल. 
धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... नोकरदार व्यक्तींना जानेवारीमध्ये नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील. नवीन वर्षात जानेवारी ते जून 2017 या काळात जबाबदारी वाढत राहील. नवीन जागी बदली होण्याची शक्यता एप्रिल मे पासूनच दिसू लागेल. व्यापारीवर्गाला येत्या वर्षांत त्यांच्या कामात विस्तार करावासा वाटेल. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी करण्याची त्यांची तयारी असेल. या दरम्यान प्रगतीचा एक नवीन उच्चांक गाठता येईल. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत अचानक वातावरण बदलण्याची शक्यता आहे. सरकारी नियम, तांत्रिक अडचणी आणि योग्य व्यक्तींची साथ न मिळाल्यामुळे बरीच गैरसोय होईल. पैशाचा काटकसरीने वापर करा. नोकरीमध्ये वर्षांची सुरुवात उत्तम होईल. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती मिळेल. तुम्हाला बरे वाटेल. पगारवाढ किंवा बढतीची शक्यता २०१७ च्या सुरुवातीला संभवते. यामुळे तुम्ही खूश व्हाल, पण फेब्रुवारीनंतर तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. त्याचा कौटुंबिक जीवनावरसुद्धा परिणाम होईल. काहींना घरापासून लांब राहावे लागेल. मिळालेले पैसे अपुरे वाटतील. येत्या वर्षांत अधिकारांचा दुरुपयोग करू नका.
गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... गृहसौख्याच्या दृष्टीने नवीन वर्ष म्हणजे मानलं तर समाधान असे आहे. प्रयत्न करूनही ज्या गोष्टी मिळत नव्हत्या, त्या गोष्टी फेब्रुवारीपूर्वी मिळतील. घराकरता तुम्ही येत्या वर्षात फारसा वेळ देऊ शकणार नाही. जूननंतर घरातील मोठ्या जबाबदार्‍या, स्थलांतर इ. कारणांमुळे खर्च वाढतील. विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाकरता कदाचित घरापासून लांब जावे लागेल. नवीन जागेचे स्वप्न साकार होईल. फेब्रुवारीनंतर घरामधला एखादा सोहळा मे महिन्यापर्यंत लांबवावा लागेल. मार्चनंतर पुढील दिवाळीपर्यंत तुम्हाला एखादी नैतिक घरगुती जबाबदारी पार पाडावी लागेल. ही गोष्ट मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक असेल. नातेवाईक आणि मित्रांच्या फार जवळ जाऊ नका. तरुणांनी कोणतीही गोष्ट गृहीत धरू नये. आपले कर्तव्य पार पाडावे. विद्यार्थ्यांना चांगले वर्ष आहे. महिलांना खट्टा-मिठा अनुभव येईल. कलावंत, क्रीडा, सामूहिक क्षेत्रातील व्यक्तींना त्यांची कला, नैपुण्य दाखवता येईल.