testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Numrology : अंकानुसार जुलै 2017 राशिभविष्य

Last Modified शुक्रवार, 30 जून 2017 (20:52 IST)
अंक 1 - जुलै 2017 चे राशी
जुलै:
या महिन्यात तुम्हाला सामाजिक, राजकीय क्षेत्रात मान- सन्‍मान प्राप्‍त होईल. परंतु, महिन्‍याच्‍या दुस-या आठवड्यात तुमचे शत्रू तुमच्‍या मार्गात अडथळे आणतील. व्‍यापार व्यवसायात तणावात्‍मक स्थिती निर्माण होईल. न्‍यायालयीन खटल्‍यात तुमच्‍या विरोधात निर्णय लागतील. महिन्‍याचा शेवटचा आठवडा तुमच्या दृष्‍टीने अनुकूल. विवाहेच्‍छुकांचे विवाह ठरतील. राजकीय क्षेत्रातील मंडळींसाठी हा आठवडा चांगला जाईल. आर्थिक लाभ संभवतो. शिक्षणामुळे लाभ होण्‍याची शक्‍यता आहे. तुमच्‍या क्रमांकाचा स्‍वामी सूर्य असल्‍याने त्‍याच्‍या प्रभावामुळे हा महिना तुम्‍हाला चांगले फळ देणारा ठरेल.
अंक 2 -
जुलै 2017 चे राशीभविष्य
जुलै महिन्यात सर्व क्षेत्रात जागरूक राहाणे आवश्यक आहे. अंक दोन असणा-या लोकांनी शत्रूला हरवण्यासाठी कृष्ण नीतीचा वापर करावा. महिन्याच्या मध्यात महत्वाच्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात विरोधी अडचणी निर्माण करू शकतात. महिन्याच्या शेवटी अचानक धनलाभाचा योग आहे. जोडीदाराचे मत विचारात घेऊनच काम करा तरच व्यवसायात फायदा होईल.
अंक 3 -
जुलै 2017 चे राशीभविष्य
जुलै - या महिन्‍यात स्थिती चांगली आहे. प्रवासात सावधानता बाळगावी, नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्‍यांना अभ्‍यासात लक्ष देण्‍याची गरज आहे. दृढ निश्‍चयाने आणि बुद्धीने कामे केल्‍यास चांगले यश मिळू शकते. नोकरीच्‍या ठिकाणी आणि कौटुंबिक जीवनात तणावाची स्थिती राहील. आरोग्‍याकडे लक्ष देण्‍याची आवश्‍यकता. महिन्‍याच्‍या शेवटचा कालावधी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासाठी अनुकूल असेल. तरुण तरुणींसाठी शेवटचा आठवडा शुभ फळ देणारा.
अंक 4 -
जुलै 2017 चे राशीभविष्य
जुलै - हा महिना नोकरीसाठी चांगला नाही. प्रतिस्‍पर्धीच्‍या तुलनेत स्‍वत:ला कमजोर समजाल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्‍यावा लागेल. व्‍यवसायात नवीन संधी शोधण्‍याचा प्रयत्‍न करा. वेळ अनुकूल आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. मन आनंदी राहील. जोडीदाराबरोबर फिरायला जाण्याचा योग बनेल. महिन्‍याच्‍या शेवटी नव्‍या कामामुळे आनंद मिळेल. गुंतवणूकीसाठी कालावधी एकदम चांगला आहे. सहका-यांना आपली प्रगती सहन होणार नाही.
अंक 5 -
जुलै 2017 चे राशीभविष्य
जुलै -
या महिन्यात तुमचे वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य कमी लाभेल. परदेशातून लाभप्राप्तीचे योग आहेत. महिन्याच्या मध्यकाळात आत्मविश्वासामुळे अधिक नफा मिळणार आहे. तरीही निर्णय घेताना वेळेवर घ्या. काही क्षेत्रातून सहकार्य मिळाल्याने फायदा होईल व त्याचा विस्तार होईल. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरोग्याची समस्या निर्माण होईल. निराशा येईल पण ताजेतवाने राहण्याचा प्रयत्न करा. या महिन्यात तुम्ही नविन वाहन घेण्याचा विचार करु शकाल.
अंक 6 -
जुलै 2017 चे राशीभविष्य
जुलै - हा महिना या अंकाच्या लोकांसाठी मोठी फळे घेऊन येत आहे. कार्यालयात सगळ्याचे सहकार्य मिळणार आहे. आकर्षक व्यक्तिमत्वामुळे आपल्या कार्यात यश मिळेल. शुक्राचा प्रभाव असल्याने राग अनावर होईल. या महिन्यात शुक्राची आराधना करा. शिवलिंगवर पाणी आणि कच्चे दुध चढवावे. या महिन्यात काही रचनात्मक काम करा ज्यामुळे समाजात यश किंवा प्रसिध्दी मिळेल. या महिन्यात पांढरया रंगाची कपडे परिधान केल्यास अधिक लाभ होईल.
अंक 7 -
जुलै 2017 चे राशीभविष्य
जुलै - जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 अथवा 25 तारखेला झाला असेल तर तुमचा शुभ अंक 7 आहे. या अंकाचा स्वामी वरुणदेव आहे. 7 अंक असणार्‍या लोकांवर चंद्राचा विशेष प्रभाव असतो. या महिन्यात घर खरेदी करण्‍याचे अथवा बांधण्याचे योग आहेत. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रखडलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी कर्ज घ्यावे लागू शकते. वादविवाद टाळा. कोर्ट कचेरीच्या कामांना विलंब होईल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साथ देईल.
अंक 8 -
जुलै 2017 चे राशीभविष्य
जुलै - शनी ग्रह हा अंक आठचा स्वामी आहे. ज्या लोकांचा अंक आठ आहे, ते लोक अचानक काम करण्यात विश्वास ठेवतात. त्यांची विचारशक्ती अद्भुत असते. त्यांच्याकडून बळजबरीने कोणतेही काम करून घेता येत नाही. आठ अंक असणा-या व्यक्तींसाठी जुलै महिना मध्यम स्वरूपाचा आहे. या महिन्यात व्यवसायात उन्नती होईल. जमीन व्यवहारात लाभ होईल. शत्रूंना पराजित कराल. बढती मिळण्याचे योग आहेत.
अंक 9 -
जुलै 2017 चे राशीभविष्य
जुलै
- जुलै महिना ९ अंक असणा-या व्यक्तिंसाठी चांगला राहणार आहे. गुतंवणूकीतून लाभ होईल. व्यापारासाठी प्रवासाला जाणार असाल तर ही यात्रा फायदेशीर ठरेल. नवे संबंधाचे प्रस्ताव येतील. जोडीदाराच्या व्यस्ततेमुळे तुम्हाला वेळ मिळणार नाही. अचानक प्रवासाचा योग घडू शकतो, आणि हा प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरेल. व्यवसाय चांगला राहिल. नोकरीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणचे वातावरण आनंददायी राहिल.


यावर अधिक वाचा :

मरणापूर्वी नेमके काय दिसते?

national news
अनेकांच्या मते जीवनातले अंतिम सत्य हे मृत्यू असते, पण मृत्यूनंतर काय? हा प्रश्न अनेकांना ...

चावू नाही तुळशीची पानं, हे करणेही टाळा

national news
तुळशीचे पानं चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा धातूचे घटक ...

राहू-शनीचा कुप्रभाव

national news
कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू ...

जानवे घालण्याचे 9 फायदे

national news
जानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...

13 जुलैला सूर्य ग्रहण, काय करावे काय नाही, जाणून घ्या

national news
13 जुलैला वर्षाचं दुसरं सूर्य ग्रहण आहे. या पूर्वी 15 फेब्रुवारी ला पहिले सूर्य ग्रहण ...
Widgets Magazine

मुंबईत दूधबंदी आंदोलनाचा परिणाम नाही

national news
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दरवाढीसाठी सुरू करण्यात आलेल्या दूधबंदी आंदोलनाचा परिणाम ...

फेसबुक वेड, दुचाकी चालवतांना केले लाईव्ह, २ ठार

national news
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात वेगाने दुचाकी चालवत असताना फेसबुक लाईव्ह करणे दोन ...

खड्ड्यांप्रकरणी MNS कार्यकर्त्यांनी PWD ऑफिसात केली तोडफोड

national news
मुंबई- ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आता पर्यंत सहा लोकांची मृत्यू ...

हॅरी केननेला मिळाला 'गोल्डन बूट'

national news
फ्रान्सने क्रोएशियाला पराभूत करत पुन्हा एकदा इतिहास रचला. दुसरीकडे इंग्लंडचा संघ चौथ्या ...

मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळला, ३०जखमी

national news
पश्चिम बंगालमधील मिदनापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना मंडप कोसळून ...