गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2018
Written By

मेष राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

मेष राशी भविष्य 2018 नुसार, गुरू आणि शनी हे दोन्ही महत्त्वाचे ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत म्हणून या वर्षाची सुरुवात ऊर्जेने आणि निर्धारांनी भरलेली असेल. योग्य निर्णय तुमच्यासाठी वर्षभर चांगल्या बातम्या घेऊन येतील. गेल्या तीन वर्षामध्ये तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा अर्धवट राहिलेल्या होत्या त्या या वर्षात नक्कीच पूर्ण होतील. मेष राशीच्या जातकांमध्ये नेतृत्व गुण भरपूर असल्यामुळे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्यात आपले नाव व्हायला पाहिजे ही तुमची नेहमीत इच्छा असते.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी....
उत्पन्न वाढेल; तुम्ही कारकीर्दीत अधिक उंचीवर पोहोचाल. लांबाचे प्रवास फलदायी असतील आणि त्यांचे चांगले परिणाम होतील. ऑक्टोबरच्या मध्यानंतर उत्पन्न काहीसे कमी होईल आणि कष्ट करण्याची आवश्यकता असेल. व्यापारीवर्गाला गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागले त्याची कसर भरून काढायची असे त्यांचे उद्दिष्ट असेल. गुरू सप्तमात असल्यामुळे अनेक घटना मनाप्रमाणे घडतील. तुमच्या प्रयत्नांना नशिबाची जोड लाभेल. कायदेशीर किंवा कोर्ट व्यहारामध्ये अडथळे आले असतील तर त्यातून आता काहीतरी मार्ग निघेल. जानेवारी, फेब्रुवारी महिने विशेष चांगले जातील. मार्चच्या शेवटी नवीन करार करू नका. कारखानदारांना देशात किंवा परदेशात नवीन शाखा उघडावीशी वाटेल. एकंदरीत वर्ष समाधान देणारे ठरेल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....
गृहसौख्य व आरोग्यमान...
तुमच्या कौटुंबिक आयुष्यात खूप गोंधळ असेल आणि तुमचे दगदगीचे वेळापत्रक व अनियमित जेवणामुळे तुम्ही आनंदी व समाधानी असणार नाही. पहिले दोन महिने आरोग्य फारसे चांगले असणार नाही. मुलांच्या आरोग्याच्या कुरबुरी राहतील, वैवाहिक आयुष्यात तुम्ही अधिक वेळ देणे आणि बांधिलकी दर्शविणे आवश्यक असेल; आणि हळूहळू तुम्ही सर्वांची मने जिंकाल. काही वेळा कामाबाबत अलिप्तता जाणवेल. एकूण, तुमच्यासाठी एक चांगले आणि प्रगतिशील वर्ष असणार आहे. विद्यार्थ्यांना येत्या वर्षात परीक्षेत उत्तम यश मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणार्‍यांना एप्रिल मे पर्यंतचा काळ चांगला आहे. सांसारिक जीवनामध्ये समाधान आणि समृद्धी देणारे ग्रहमान आहे. नवीन जागा खरेदी करून तेथे एप्रिल-मेच्या सुमारास स्थलांतर करता येईल. तरुणांचे वैवाहिक जीवनात पदार्पण होईल. त्यांचे परदेशात स्थिर होण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. घरातील शुभ समारंभ जून जुलैपूर्वीच पार पडतील. नवीन वास्तूमध्ये राहावयास जाण्याचे बेत जूननंतर येतील.