testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साप्ताहिक राशीभविष्यफल 24 ते 30 जून 2018

मेष : पैशाची चणचण भासेल
सभोवतालच्या व्यक्तींचा नवीन अनुभव घ्याल. व्यवसायात कामात प्रगती असली तरी फायदा मिळायला वेळ लागेल. पैशाची थोडी चणचण भासेल. मनाला पटेल, रूचेल तीच कामे करा. नोकरीत नको त्या कामात वेळ जाईल. जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. घरात तुम्ही तुमचे विचार परखडपणे मांडाल. “शब्द हे शस्त्र आहे’,लक्षा ठेवा. मतलबी व्यक्तींपासून चार हात लांब रहा. आरोग्य मात्र सुधारेल.

शुभ दिनांक : 24,28,29,30

वृषभ : महिलांचा खर्च वाढेल
दैवाची साथ मिळेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन राहील. अनपेक्षित फायदा मिळवून देणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. नोकरीत बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्याल. विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. महिलांचा खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठीच असेल. आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. तरूणांचे विवाह जमतील.
शुभ दिनांक : 26,27,29,30

मिथुन : प्रवासाचे बेत ठरतील
चित्त स्थिर नसल्याने तळ्यात-मळ्यात रहाल. व्यवसायात योग्य व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना घ्या. कर्तव्यपूर्तीला महत्त्व द्या. शिस्त मोडू नका. नोकरीत मिळालेल्या संधीचे सोने करा. वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवा. कुटुंबासमावेत दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. महिलांना नवीन वस्तू, दागिने खरेदीचा मोह होईल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. पैशाचे व्यवहार जपून करा.
शुभ दिनांक : 25,26,27,29

कर्क : कामाचा ताण वाढेल
काही तरी भव्यदिव्य करण्याची सुप्त इच्छा राहील. परंतु सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून पुढे जा. व्यवसायात धोरणी राहून कामे संपवा. पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत नवीन अनुभव येतील. कामाचा ताण वाढला तरी चिडू नका. महिलांनी हातून चुका होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. शक्‍यतो आपल्या घराकडे लक्ष द्या. तसेच तडजोडीचे धोरण ठेवून इतर व्यक्तींशी वागावे. मानसिकेतला जपावे.
शुभ दिनांक : 24,26,27,30

सिंह : नवीन कामे मिळतील
हाती घ्याल ते तडीस न्याल’ व्यवसायात प्रत्येक काम वेळेत पूर्ण करून यश मिळवाल. पैशाची आवक वाढेल. तुमचे आखलेले आडाखे अचूक येतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल. सुवार्ता कळेल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. खेळाडू, कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात मान मिळेल.
शुभ दिनांक : 25,27,29

कन्या : नवीन ओळखी होतील
काही तरी मिळवण्यासाठी काही तरी सोडावे लागेल, याची प्रचिती येईल. व्यवसायात योग्य निर्णय घेऊन कृती करावी लागेल. कामात कर्तव्यदक्ष राहणे आवश्‍यक ठरेल. नोकरीत प्रलोभनांपासून स्वत:ला दूर ठेवणे फायद्याचे होईल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. अनेक ठिकाणी लक्ष देता येईल. महिलांना मनाची एकाग्रता साधता येईल. आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल.
शुभ दिनांक : 24,25,26,29

तूळ : पैशाची चिंता मिटेल
तुम्ही व्यवहारात इतरांचे सहकार्य कसे मिळवता यावर यश अवलंबून राहील. व्यवसायांत नवीन योजना हाती घ्याल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत हातून चांगली कामे पार पडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. वरिष्ठांच्या मर्जीत राहून फायदा मिळेल. महिलांना आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. घरात मनाप्रमाणे कामे होतील. शुभवार्ता कळेल.
शुभ दिनांक : 26,27,29,30

वृश्चिक : डोके शांत ठेवा
प्रयत्ने वाळूचे…. या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात मेहनत व चिकाटीने अशक्‍यप्राय कामे शक्‍य करून यश मिळवाल. कामाचा उरक दांडगा राहील. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. नोकरीत कार्यक्षमता वाढवून कामे कराल. बेफिकीर राहून चालणार नाही. महिलांना तात्विक वादविवादांना सामोरे जावे लागेल. तरी डोके शांत ठेवा. बोलताना इतरांची मने दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या. तरुणांनी अतिसाहस टाळावे.
शुभ दिनांक : 25,26,27,29

धनु : प्रियजनांच्या भेटीचे योग
व्यवसायात आश्‍वासने देताना आपली कुवत ओळखून सावधगिरीने आश्‍वासन द्या व ते पाळा. आर्थिकस्थिती समाधानकारक राहील. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत कोणावरही विसंबून राहू नका. नवीन हितसंबंध जोडताना त्या व्यक्तीची विश्‍वासर्हता पडताळून बघा. घरात अतिविचार न करता कृतीवर भर राहील. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.
शुभ दिनांक : 24,26,28,30

मकर : अनपेक्षित खर्च वाढेल
कामात विनाकारण झालेली धावपळ, दगदग कमी होईल. कामातील त्रुटी भरून निघतील. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. अनपेक्षित खर्च होईल. नोकरीत वरिष्ठांचे दुटप्पी धोरण तुम्हाला बुचकळ्यात टाकेल. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. घरात टाळता न येणारे खर्च होतील. पैशाची तजवीज करून ठेवावी लागेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल.
शुभ दिनांक : 27,28,30

कुंभ : मनासारखे काम मिळेल
अतिविचार न करता बेधडक निर्णय घेण्याकडे कल राहील. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी ठोस उपाय कराल. कमी श्रमात जास्त यश मिळवाल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. नोकरीत महत्त्वाची कामे स्वत: करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. अचूक पारख करून कामे मिळवाल. कामात सुधारणा होईल. घरात तणावाचे वातावरण कमी होईल. तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल.
शुभ दिनांक : 24,26,28,30

मीन : आर्थिक लाभ होतील
व्यवसाय नोकरीत मनातील इच्छा सफल होतील. काही महत्त्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. कल्पकता दाखवून कामे उरकाल. घरात तुमचा उत्साह व आत्मविश्‍वासाने केलेली कृती कौतुकास पात्र होईल. महिला मोठ्या खुबीने कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लावतील. घरातील वातावरण आनंदी राहील. राजकारणी, कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.
शुभ दिनांक : 27,28,29


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

जैन धर्मातील प्रमुख पंथ

national news
जैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील

क्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)

national news
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात ...

पितृपक्ष: चुकून नका करू हे 10 काम

national news
या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर ...

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे

national news
हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. तसेच काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून देव आईची ...

नवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका

national news
नऊ दिवसांचा उपास ठेवणार्‍यांनी अस्वच्छ कपडे आणि बगैर धुतलेले कपडे नाही परिधान करायला ...

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...