शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2018
Written By

मीन राशीच्या जातकांचे वर्ष 2018चे संपूर्ण वार्षिक राशीभविष्यफल

मीन राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल 
मीन राशीच्या राशी भविष्यानुसार, नवीन वर्षात राशीच्या अष्टमात गुरू राहणार आहे, तर शनी दशमावर असणार आहे. त्यामुळे तुमच्या वागण्या बोलण्यात सजगवृत्ती वाढेल. मार्चनंतर आशादायक घटना घडू लागल्यावर तुमचा उत्साह वाढेल. सप्टेंबरनंतर शुक्रही तेथेच येणार आहे. हे दोन ग्रह जरी अनुकूल नसले तरी दशमस्थानातला शनी आणि मे महिन्यानंतर लाभस्थानात राहणारा मंगळ चांगले असल्यामुळे मानलं तर समाधान अशी तुमची स्थिती वर्षभर राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली बाब म्हणजे वर्षभर पैसे मिळत राहिल्यामुळे तुम्ही सर्व समस्यांना तोंड देऊ शकाल. देशातील अथवा परदेशातील कामांना गती मिळाल्यामुळे लांबाचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. 
 
धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
कामाच्या ठिकाणी इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता तुम्हाला वाटेल. वरिष्ठांच्या खूप अपेक्षा असतील; त्यामुळे एकाच वेळी तुम्हाला सगळ्या बाबतीत जुळवून घ्यावे लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या जानेवारी हा खूपच आव्हानात्मक महिना असेल; त्यामुळे कोणताही मोठा व्यवहार फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुढे ढकला. त्यानंतर तुमचे उत्पन्न वाढते राहील. प्रमाणापेक्षा अधिक ताण घेतलात किंवा कामात बुडून गेलात तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. एखादा अनिच्छित प्रवास घडू शकेल. सप्टेंबर व डिसेंबर या दरम्यान तुमचे प्रयत्न आणि इतरांकडून मिळणारी साथ यांचा समन्वय झाल्यामुळे यशाचे प्रमाण वाढेल. देशातील अथवा परदेशातील कामांना गती मिळाल्यामुळे लांबाचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. मे हिन्यापासून 
उत्पन्नाचे नवीन साधन मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहीजणांना परदेशातील एखादे काम मिळेल. व्यावसायिक कारणानिमित्त तुम्हाला तुमचा वास्तव्याचा पत्ता बदलावा लागेल. 
पुढेे पहा गृहसौख्य व आरोग्यमान... 
गृहसौख्य व आरोग्यमान... 
नाजूक प्रकृतीच्या मीन राशीच्या व्यक्तींना वर्षभर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, त्यानंतर ते चांगले आयुष्य जगू शकतील. कौटुंबिक सुख आणि स्वास्थ्य या दृष्टीने वर्ष आनंदाचे जाईल. जरी खर्च वाढले तरी ते चांगल्या कारणामुळे असल्याचे समाधान लाभेल. पूर्वी ठरलेला अथवा लांबलेला शुभसमारंभ एप्रिल ते जुलै या काळात घडून येईल. विवाहास उत्सुक व्यक्तींचे विवाह मार्च ते सप्टेंबर या दरम्यान ठरून सप्टेंबरनंतर पार पडतील. वृद्धांच्या जीवनात आनंद व समाधान राहील. तब्येतीच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष थोडेसे खडतर आहे. पण त्याची पर्वा न करता तुम्ही काम रेटत राहाल. तरुणांनी येत्या वर्षात जास्त धाडस करू नये. त्यांचे विवाहाचे बेत थोडेफार लांबण्याची शक्यता आहेत. वैवाहिक आयुष्य सुखकर असेल आणि तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये तुमचा जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल. मुले खोडकर राहतील आणि त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. विद्यार्थी अभ्यासामध्ये शॉर्ट-कट आणण्याचा प्रयत्न करतील आणि ते काहीसे लहरी होतील. तुम्हीसुद्धा आयुष्यात शॉर्ट-कट घेण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील, पण कालांतराने तुम्हाला हा मार्ग सोडावा लागेल. ऑक्टोबरनंतर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. एकुणातच, या वर्षात तुम्हाला आरोग्याला अधिक प्राधान्य द्यावे लागेल आणि आयुष्याच्या सर्व आघाड्यांवर समतोल साधावा लागेल.