बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Updated : सोमवार, 23 डिसेंबर 2019 (13:00 IST)

Love Horoscope 2020 प्रेम राशिभविष्य: मेष

हे वर्ष मेष राशीच्या जातकांसाठी प्रेम जीवनात मिश्रित परिणाम देणारा सिद्ध होणार आहे. जर आपण आधीपासूनच प्रेम बंधनात आहात तर या वर्षी पार्टनरकडून आपल्या अधिक अपेक्षा असतील. ज्यामुळे आपसात तक्रार होऊ शकते. पण हे सर्व असूनही आपलं आपसातील प्रेम अतूट राहील.
 
फेब्रुवारी महिना आपल्यासाठी विशेष राहणार आहे कारण या महिन्यात आपली लव्ह लाईफ आनंदाने भरेल. आपण आधीपासून रिलेशनशिपमध्ये नसल्यास या महिन्यात आपली इच्छा पूर्ण होऊ शकते अर्थातच जीवनात कोणी येऊ शकतं. 
 
या व्यतिरिक्त प्रेम जीवनात काही समस्या असल्यास पार्टनरला खूश करण्यासाठी खास भेटवस्तूची गरज पडेल. या वर्षी प्रेम जीवनासाठी सर्वश्रेष्ठ महिने फेब्रुवारी, मार्च, जून-जुलै आणि डिसेंबर असतील. या दरम्यान आपण पार्टनरसोबत चांगला काळ व्यतीत कराल. 
 
तसेच आपण आपल्या पार्टनरसोबत काही व्यवसाय सुरू करू इच्छित असल्यास जानेवारी ते मार्च महिना उत्तम ठरेल. या दरम्यान आपण सुरू केलेल्या कोणत्याही कामात यश मिळण्याची शक्यता आहे. एकूण या वर्षी आपल्या आविष्यात आपल्या पार्टनरला किती महत्त्व आहे हे दाखवण्यासाठी भरपूर संधी असून आपण वर्षभर प्रेम जीवन आनंदात घालवाल.