रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Updated : गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (17:59 IST)

NEW YEAR 2020 Astro Tips : 20 महत्त्वाच्या गोष्टी, फायदेशीर ठरतील

नववर्ष 2020 आमच्या सर्वांसाठी सुखमयी असो या शुभेच्छांसह आम्ही आपल्या धर्मशास्त्रांतील काही असे उपाय सांगणार आहोत जे वर्षभर अमलात आणून आपण सुखाने नांदू शकता. तर जाणून घ्या नववर्षात हे 20 संकल्प आपल्यासाठी सुखाचे मार्ग मोकळे करतील.
 
घराला मंदिराची संज्ञा दिली गेली आहे. घरातील वातावरणाचा प्रभाव आपल्या सामान्य जीवन आणि दिनचर्येवर पडत असतो. अशात जर कुटुंबातील वातावरण अनुकूल नसेल तर घरातील प्रत्येक सदस्याचं जीवन प्रभावित होऊ शकतं. जर आपल्या घरात देखील कोणत्याही कारणामुळे शांती टिकत नसेल तर आपण हे उपाय अमलात आणू बघू शकता. 
 
1.) घरात सकाळी काही वेळासाठी भजन, मंत्र, प्रार्थना स्रोत इ. अवश्य लावावं.
 
2.) घरात कधीही झाडू उभी ठेवू नये. झाडूला पाय लावू नये, ओलांडू नये, याने घरातील बरकत कमी होते.
 
3.) बिछान्यावर बसून जेवू नये, असे केल्याने वाईट स्वप्न येतात.
 
4.) घरात जोडे-चपला इकडे-तिकडे फेकू नये, याने घरात अशांती उत्पन्न होते.
 
5.) पूजा करण्याची वेळ सकाळी 6 ते 8 दरम्यान असावी. पूजा भूमीवर आसन पसरवून, पूर्व किंवा उत्तर दिशेकडे मुख करून पूजा करावी.
 
6.) भोजन तयार करताना पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावी.
 
7.) पूजा घरात नेहमी पाण्याने भरलेलं कलश ठेवावं.
 
8.) धूप, दीप, आरती, पूजा अग्नी सारखे पवित्रतेचे प्रतीक साधन कधीही फुंक मारून विझवू नये.
 
9.) मंदिरात धूप, उदबत्ती, हवन कुंडाची सामुग्री, दक्षिण पूर्व दिशेत ठेवावी.
 
10.) घराच्या मुख्य दाराच्या उजवीकडे स्वस्तिक काढा.
 
11.) घरात कधीही जाळे लागू देऊ नये, याने घरात राहूचा प्रभाव वाढतो.
 
12) संध्याकाळी झोपू नये. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या इष्टदेवाचे स्मरण करावे.
 
13.) घराच्या मध्य भागात खरकटे भांडे स्वच्छ करण्याची जागा नसावी.
 
14.) वर्षाच्या सुरुवातीला व्यसन न करण्याचा संकल्प घेऊन वर्षभर संकल्प पाळावा.
 
15.) एखादं मंत्र पूर्ण विश्वासासह पाठ करून वर्षभर त्याचा जप करावा.
 
16.) वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणतेही एक दैवत आपले इष्ट असल्याचे धरून वर्षभर त्यांची उपासना आणि उपाय करावे.
 
17.) कोणी असहाय्य, दिव्यांग किंवा अनाथ व्यक्तीची मदत करण्याचा संकल्प घेऊन पूर्ण करावा.
 
18.) वर्षाच्या सुरुवातीला एखाद्या गरीब मुलीच्या शिक्षण आणि विवाहाचा संकल्प घेऊन जबाबदारी पार पाडावी.
 
19.) वर्षाच्या सुरुवातीला पशू सेवा, पशू प्रती मानवीयतेचा संकल्प घेऊन पाळावा.
 
20.) वर्षाच्या सुरुवातीला वृक्षारोपण करून त्याची काळजी घ्यावी.