सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:34 IST)

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: धनू

आपण जेवढे कमावाल तेवढेच मिळेल अशी स्थिती दर्शविणारे असे काही हे वर्ष आहे. तुम्ही जितके अधिक काम कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील. म्हणजेच आपल्या स्वत: च्या प्रयत्नांनी आपण मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याच्या स्थितीत असाल. तथापि आपल्याला गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
 
काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीसाठी अचानक खर्च करावा लागू शकतो. मार्च अखेरीस ते जून अखेरीस संपत्ती साठवण्यासाठी चांगला काळ असेल आणि त्या दरम्यान आपण जतन करण्यात सक्षम व्हाल.
 
आपण अल्पमुदतीची गुंतवणूक केल्यास फायदा होईल. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीने तोटा संभवतो. वर्षाच्या मध्यभागी अवांछित खर्च होऊ शकतात जे आपल्या बजेटवर परिणाम करू शकतात. घरात एखाद्या मांगलिक समारंभासाठी खर्च कराल. पैशांची आवक चांगली राहील पण खर्च पण तसेच वाढतील. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे योग आहे. वर्षाच्या अखेरीस आर्थिक परिस्थिती सुधारेल. ह्या वर्षी आपण चांगले कपडे, दागिने आणि सुविधांवर खर्च कराल. 
 
दुसर्‍यावर विसंबण्याऐवजी स्वत: चा प्रयत्न करा त्याचा आपणास जास्तीत जास्त फायदा होईल. उसने पैसे देण्यापूर्वी नीट विचार करा. मगच पैसे द्या.