सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:18 IST)

Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: वृश्चिक

हे वर्ष आपल्या आरोग्यासाठी सामान्य असेल. या वर्षी आपणास आपली मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढविण्याकडे विशेष कल राहील. यासाठी आपण योगाभ्यास आणि प्राणायाम आवर्जून कराल. 
 
जानेवारीनंतर आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगले राहाल. तुमची ऊर्जा शक्ती वाढेल आणि तुम्ही तंदुरुस्त राहाल. पोटाच्या समस्या, आतड्यांचे संक्रमण या सारखे आजार आपल्या खाण्याच्या वाईट सवयींमुळे उद्भवू शकतात. त्या साठी जेवणाचे नियम काटेकोरपणाने पाळा.
 
या काळात आपणास मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. काही समस्यांना अचानक तोंड द्यावे लागतील. आपण या परिस्थितीमधून मार्ग काढून यशस्वीरीत्या निघाल. या वर्षी आपल्याला फक्त आपला नित्यक्रम नियमित ठेवणे. व्यायाम आणि योगा उपक्रमांसह स्वत: ला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणे हेच ध्येय आहे.