मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (15:21 IST)

साप्ताहिक राशीफल 25 ते 31 ऑक्टोबर 2020

मेष : तुमच्या हलगर्जीपणे बर्‍याच गोष्टी बिघडू शकतात, त्याची काळजी घ्या. वडील, समाजातील प्रभावशाली व्यक्ती, उच्च पदाधिकारी किंवा इतर व्यक्तींशी तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. याला टाळायचा प्रयत्न करायला पाहिजे. यात तुमचे अहं पुढे येऊ देऊ नका. कौटुंबिक बाबतीत या आठवड्यात शांती राहणार आहे. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही बौद्धिक कार्यांमधून चांगली कमाई करू शकता. जे लोकं नोकरी करणारे आहेत, ते लोकं आपल्या प्रतिभेमुळे अधिकार्‍यांना प्रभावित करण्यात यश मिळवतील. या मुळे येणार्‍या भविष्यात तुमचा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या पत्रिकेत बाराव्या घरात सूर्य आणि मंगळासारखे अग्नितत्त्वाचे दोन ग्रहांसोबत पाप ग्रह केतूची युती आहे. तुम्ही कुठल्याही चुकीच्या दिशेत आपल्या शक्तीचे प्रदर्शन करू नये.
 
वृषभ :  प्रेम प्रकरणात भावनात्मक संबंधांचे वाईट परिणाम येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. या वेळेस तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष्य देण्याची गरज आहे. वैवाहिक संबंध सामान्य राहतील. जमीन घर आणि स्थायी मालमत्ता व कृषी संबंधित उत्पादनांमुळे तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. लेखन, कविता, नवं सृजन, दलाली, बँकिंग इत्यादींसाठी वेळ अनुकूल आहे. या आठवड्यात भाग्य तुमच्या साथ देईल आणि व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात संतुलन ठेवणे गरजेचे आहे. कौटुंबिक संबंध उत्तम असतील, पण तुम्हाला विनम्र राहणे फारच गरजेचे आहे. या आठवड्यात तुमच्यात भरपूर साहस राहणार आहे. साहित्य आणि धार्मिक संस्थेशी निगडित लोकं या आठवड्यात बरेच व्यस्त राहतील.  
 
मिथुन : तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. बाजारात तुमच्या उत्पादनांची मागणी वाढणार आहे ज्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल. इलेक्ट्रॉनिक्स, स्पेयर पार्ट्स, मशीनरी, द्रव्य पदार्थ, खाद्य सामग्री, ब्यूटीपार्लर, शेअर बाजार, कपडे इत्यादींच्या व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमच्या घरात शुभ प्रसंग घडण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीशी तुमची भेट होण्याची शक्यता आहे. सरकारी विभागात अडकलेले कार्य पूर्ण होतील. प्रेम प्रकरणात थोडी सावधगिरी बाळगणे जरूरी आहे. तुम्हाला तुमच्या वाणीवर संयम ठेवायला पाहिजे. तुम्हाला या आठवड्यात दुःखद वार्ता मिळण्याची शक्यता आहे.
 
कर्क : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष्य देणे फारच गरजेचे आहे. हाडांचे दुखणे, नेत्र पीडा, डोक्याचे दुखणे, पोटाशी निगडित आजारांमुळे तुमचे कामात लक्ष्य लागणार नाही. जे लोकं प्रतिस्पर्धी परीक्षाची तयारी करत आहे त्यांच्यासाठी हा काळ फारच कठिण आहे, म्हणून त्यांना जास्त मेहनत करावी लागणार आहे. ज्या लोकांना विदेशात जायचे आहे, त्यांना थोडी वाट पाहवी लागणार आहे. नोकरी करणार्‍या लोकांसाठी हा आठवडा फारच उत्तम जाणार आहे. त्यांना आर्थिक लाभ, प्रमोशन, कंपनीकडून सर्व सुख सुविधा मिळण्याची शक्यता आहे. 
 
सिंह : तुम्हाला जोडीदाराकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात भागीदारीच्या व्यवसायात फायदा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात पैशांवरून कोणाशी मतभेद होण्याची शक्यता आहे. गणेशजींचा सल्ला आहे की प्रकरण पोलिसापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 1 13 आणि 14 तारखेला तुम्ही थोडे तणावात राहाल. जे लोकं परदेश जाण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी हा वेळ अनुकूल आहे. या आठवड्यात तुमच्या कार्यांना गती मिळेल. विदेशात वर्क परमिट संबंधित प्रकरणात सकारात्मक बदल बघायला मिळेल. सरकारी क्षेत्रात नोकरी करणार्‍या लोकांसाठी हा आठवडा फारच फायदेशीर ठरणार आहे. 
 
कन्या : वित्तीय प्रकरणासाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. पण भागीदार आणि कुटुंबातील लोकांची मदत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. शेअर बाजार, कमिशन, ट्रेडिंग इत्यादी संबंधी विवेकपूर्ण आणि विचार करून घेतलेला निर्णय तुम्हाला सकारात्मक परिणाम देतील. गणेशजींचा सल्ला आहे की वाहन किंवा मशीनरी चालवताना सावधगिरी बाळगायला पाहिजे अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा फारच उत्तम ठरणार आहे. तुम्हाला या काळात एखाद्या विषय तज्ज्ञाचे मार्गदर्शन मिळू शकते. श्रेष्ठ विद्यार्थ्यांना शाळा प्रशासन आणि समाजाकडून सन्मानित करण्यात येईल. 
 
तूळ : तुम्ही तुमची आर्थिक स्थिती आणि व्यवसाय विस्तार संबंधी योजना आखू शकता. जमीन, घर किंवा स्थायी मालमत्ता संबंधी प्रकरणात बर्‍याच काळापासून अडकलेले प्रकरण या आठवड्यात संपुष्टात येतील. एखाद्या व्यक्तीसोबत लिखित किंवा मौखिक संप्रेषणात कुठल्याही प्रकाराची चुका करू नका. जर तुम्ही वित्तीय घेवाण देवाण करत असाल तर तुम्हाला मध्यस्थीसाठी एखादा साक्षीदार ठेवणे गरजेचे आहे कारण वित्तीय प्रकरणात धोका होण्याची शक्यता आहे. तुम्हाला मिळालेल्या व्यावसायिक यशामुळे लोक तुमच्यावर चिढतील आणि तुमच्या विरोधात षडयंत्र रचतील. तुम्ही मनोरंजनाच्या साधनांवर आपला वेळ घालवाल आणि आपल्या जोडीदाराला बाहेर जेवण्यासाठी घेऊन जाल. तुम्ही परदेशात किंवा देशभ्रमण करू शकता. 
 
वृश्चिक : 25, 26 आणि 27 तारखेला वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे फारच गरजेचे आहे, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. डोके किंवा गुडघ्यांशी संबंधित आजार तुम्हाला अस्वस्थ करेल. वीज आयोजित वस्तूंशी संबंधित कार्यांना करताना सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे. आर्थिक प्रकरणात हा आठवडा फारच उत्साहवर्धक ठरणार आहे. म्हणूनच तुमचे कुठलेही महत्त्वपूर्ण कामं अडणार नाही. व्यवसाय  विस्तारासाठी तुम्ही ठोस योजना आखू शकता आणि त्यांना अमलात आणण्याचा प्रयत्न कराल. विरोधी पक्षांना घाबरण्याची काहीच गरज नाही आहे, कारण त्यांनी रचलेले कट निकामी ठरतील.  
 
धनू : तुमच्या व्यवसायात किंवा पारिवारिक कार्यांमध्ये मुलांचा महत्त्वाचा योगदान राहील. संतानपक्ष तुमच्या बरोबरीने काम करेल आणि आर्थिक मदतीसाठी पुढे येईल. भागीदारीच्या कार्यांमध्ये तुम्ही प्रगतीची अपेक्षा करू शकता. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल आहे. या आठवड्यात विद्यार्थी मनोरंजनासोबत अभ्यासाकडे ही आपले भरपूर लक्ष्य देतील. संशोधन आणि उच्च शिक्षा प्राप्त करत असलेल्या लोकांना उत्तम परिणामाची अपेक्षा असेल. पचन तंत्र, पोट आणि लिव्हरशी निगडित विकार होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे फारच गरजेचे आहे. 
 
मकर : या काळात तुमच्यात असणारा तुमचा प्रबंधकीय गुण लोकांसमोर येईल. देश विदेशात व्यापाराचा विस्तार करून तुम्ही आर्थिक लाभ मिळवू शकता. या वेळेस तुम्ही दिलेले उसने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे ज्याने तुमच्या आर्थिक आयोजनात विघ्न येणार नाही. लग्न करणार्‍या जातकांसाठी हा काळ उत्तम आहे. जे लोक नोकरीत बदल करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे, त्यांना प्रयत्न करायला पाहिजे. तुमच्या बौद्धिक संपदेत वृद्धी होईल. दागिने, भौतिक साधन, कार, वस्त्र, मनोरंजनाच्या वस्तू, गॅझेट्स इत्यादीची खरेदी करू शकता.  
 
कुंभ : आठवड्यात तुमच्या खर्चात वाढ होणार आहे, आणि तुम्हाला जाणवेल की पैसा पाण्यासारखा तुमच्या हातातून जात आहे. पण अशा परिस्थितीतही तुम्हाला पैशाची तंगी राहणार नाही. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढणार आहे. गूढ विद्या आणि रहस्यमय कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. कौटुंबात मांगलिक कार्य होण्याची शक्यता आहे, जो तुम्हाला संपूर्ण आठवडा व्यस्त ठेवेल. विरासत किंवा संपतीशी निगडित प्रकरणात सकारात्मक निष्कर्ष समोर येण्याची शक्यता आहे. मार्केटिंगच्या कार्यांसाठी जातकांना प्रवास घडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही कुटुंबाला फारच कमी वेळ द्याल. आयात निर्यातीच्या व्यवसायात उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. घर आणि कार्यस्थळावर भवन नवीनीकरण किंवा नवं निर्माणाचे कार्य करू शकता. 
 
मीन : परिवहन किंवा टूर्स ट्रव्हल्सच्या कामात चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्याच्या  प्रयत्नात असाल. तुमच्या यशामुळे बर्‍याच लोकांना ईर्ष्या होईल आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. पण त्यात त्यांना यश मिळणार नाही. व्यवसायी जातकांना सावध राहण्याची आवश्यकता आहे, कारण सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स व इतर सरकारी विभागांमध्ये तुम्ही अडकू शकता. त्याशिवाय कौटुंबिक प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचू शकतात. विद्यार्थी आणि नोकरी करणार्‍या लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. तुम्ही वस्त्र, दागिने, कोस्मेटिक्स इत्यादींची खरेदी करू शकता.