testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आनंदवनचा राजा हरपला

--प्रा.वसंत पुरके

वेबदुनिया|

आपले सारे आयुष्य उपेक्षित आदिवासी आणि कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी अर्पण करणार्या बाबा आमटे यांच्या निधनाबद्दल शालेय शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांनी शोक व्यक्त केला आहे.

कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन त्याचबरोबर आदिवासींना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आनंदवनासारखी सुंदर वसाहत कोणाचेही पाठबळ नसताना उभी करण्याचे अनोखे कार्य बाबा आमटे यांनी केले. केवळ त्यांच्यामुळेच आज कुष्ठरुग्णांना समाजात प्रतिष्ठा मिळाली आहे. आज या आनंदवनाच्या निर्मात्याच्या निधनामुळे या वसाहतीचा राजा हरपल्यासारखे झाले आहे, या शब्दात प्रा.पुरके यांनी शोक व्यक्त केला आहे.


यावर अधिक वाचा :