गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. बाबा आमटे
Written By वेबदुनिया|

बाबांच्या निधनाबद्दल देशभरात शोक

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही शोक व्यक्त केला आहे. या दोघांनी आपल्या शोकसंदेशात सच्चा गांधीवादी व संत असा बाबांचा उल्लेख केला आहे.

पंतप्रधान आपल्या शोक संदेशात म्हणतात, की बाबा आमटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच, मोठा धक्का बसला. गांधींच्या विचारांना अंगीकारणारा एक सच्चा व महान गांधीवादी गेला आहे. कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी केलेले कार्य महान आहे. त्यामुळे देशातील महान व्यक्तींमध्ये त्यांची गणना केली जाते. कालपटावर बाबांची पावले अक्षयपणे आपला ठसा उमटवून गेली आहेत.

जळगावमध्ये आलेल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही बाबांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. पददलितांसाठी आयुष्यभर बांधिलकी मानून काम करणार्‍याचे उत्तम उदाहरण म्हणून बाबा आमटे यांचे नाव घेता येईल, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही बाबांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या कामाचे स्मरण केले.