गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. बाबा आमटे
Written By वेबदुनिया|

महाराष्ट्र थोर समाजसेवकाला मुकला

--डॉ.पतंगराव कदम

बाबा आमटे यांच्या निधनाबद्दल सहकार मंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

डॉ.कदम आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आमटे यांच्या निधनाने महाराष्ट्र एका थोर समाजसेवकाला मुकला आहे. समाजाने दुर्लक्षिलेल्या व्यक्तिंना स्वाभिमानाने जगण्याचे बळ देऊन गांधीजींचे तत्त्व त्यांनी प्रत्यक्षात अवलंबिले. आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन हे इतिहासात सोनेरी अक्षराने कोरण्यासारखेच आहे.