1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (16:59 IST)

स्ट्रेच मार्क्सने चिंतित आहात का? तर हे घरगुती उपाय अवलंबवा

मानवी शरीरात खूप लवकर बदल होतात व स्ट्रेच मार्क्स येतात. शरीराची ग्रोथ झाल्यावर आणि वजन वाढले की हे स्ट्रेच मार्क्स येतात. जरी हे लक्षण नाही आहे की आरोग्य बिघडले आहे स्ट्रेच मार्क्स पुरुष आणि महिला दोघांना येतात. गर्भावस्था आणि तरूण होण्याच्या वेळेला सगळ्यात जास्त स्ट्रेच मार्क्स येतात. सगळ्यात आधी स्ट्रेच मार्क्स हलके लाल रूपमध्ये दृष्टीस पडतात. नैसर्गिकरित्या स्ट्रेच मार्क्सला मिटवणे सोपे नाही काही असे पण उपाय आहे ज्यांनी स्ट्रेच मार्क्सला कमी केले जाऊ शकते. खूप लवकर त्यांना कमी करू शकतो. 
 
कोरफड 
कोरफड हा नैसर्गिक उपाय आहे ज्यामुळे स्ट्रेच मार्क्सला कमी करण्यासोबत त्वचा पण मुलायम बनते. स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी घरी केला जाणारा एक साधा सरळ उपाय आहे. रोज अंघोळ झाल्या नंतर कोरफडला आपल्या त्वचेवर लावा. 
 
नारळाचे तेल 
कोरडया त्वचेमुळे स्ट्रेच मार्क्स येतात याकरिता नारळ तेल लावून यांना कमी केले जाऊ शकते रोज आपल्या स्ट्रेच मार्क्स त्वचेवर नारळाचे तेल लावल्यावर लाल रंग कमी होईल. 
 
विटामिन ए 
विटामिन ए ला रेटिनोईड मानले जाते आणि रेटिनोइड्स त्वचेला मऊ आणि तरूण बनवतो . विटामिन ए ला खूप साऱ्या कॉस्मेटिक क्रीम मध्ये वापरले जाते. यासाठी तुम्ही विटामिन ए भरपूर गाजर आणि रताळे खाऊ शकतात हे शरीरात विटामिन ए स्तर वाढवायला मदत करतात. 
 
चीनी स्क्रब 
चीनी स्क्रब मुळे स्ट्रेच मार्क्सला कमी केले जाऊ शकते. हा एक घरगुती उपाय आहे जो वापरू शकतात त्वचेवर चीनी स्क्रब लावल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होते.